शहरात १४ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:00+5:302021-05-20T04:16:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहर व परिसरात बुधवारीसुद्धा (दि. १९) मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरींचा वर्षाव झाला. ...

14 mm rain in the city | शहरात १४ मिमी पाऊस

शहरात १४ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शहर व परिसरात बुधवारीसुद्धा (दि. १९) मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरींचा वर्षाव झाला. दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र शहरातील ढगाळ हवामानही निवळण्यास सुरुवात झाली होती. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव नाशिकच्या हवामानावर मागील तीन ते चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. मंगळवरप्रमाणेच बुधवारीही मध्यरात्री उशिरापासून पहाटेपर्यंत शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा जोरदार वर्षाव झाला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३ मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच वाऱ्याचा वेग मध्यरात्री ताशी ११ कि.मी. इतक्या वेगाने वारे वाहत होते. तसेच दुपारनंतर वाऱ्याचा वेग ताशी आठ कि.मी.वर आला होता. दुपारी तीन वाजेपर्यंत ऊन सावल्यांचा खेळ पाहावयास मिळाला. त्यानंतर लख्ख सूर्यप्रकाश नाशिककरांना तीन दिवसांनंतर का होईना अनुभवयास आला. गुरुवारी वातावरण सामान्य होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने जोर पकडला होता. या दोन दिवसांत सुमारे २८ मिमीपर्यंत पाऊस पडला.

मागील दोन दिवसांत सोसाट्याच्या वान्यामुळे

सोमवार, मंगळवारी प्रत्येकी दहा असे एकूण दोन दिवसांत वीस वृक्ष कोसळले.

दुपारपासून वाऱ्याचा वेग कमी होत गेला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सरासरी सात कि.मी. प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहत असल्याची नोंद झाली.

Web Title: 14 mm rain in the city