शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१३६ अंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:38 IST

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.  महापालिकेच्या वतीने सुमारे चारशे अंगणवाड्या चालवल्या जातात. तुकाराम मुंढे यांनी या सर्व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण केले होते आणि त्यातील कमी पटसंख्या असलेल्या १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या सेविका आणि मदतनिसांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.  या अंगणवाड्या सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी महासभेत चर्चा करून ठरावदेखील केला होता, मात्र १९९३ साली महापालिकेनेच ४० पेक्षा कमी पटसंख्या असता कामा नये, असा केलेल्या ठरावाचे निमित्त करून मुंढे त्या सुरू करण्यास राजी नव्हते, तर महासभेने पटसंख्येचा निकष घटवून ४० ऐवजी २५ पटसंख्या असेल तरी आंगणवाड्या चालू ठेवण्याचे निर्देश दिले होते, परंतु मुंढे यांनी दोन वेळा महासभेत आदेश होऊनदेखील त्याचे पालन केले नव्हते.  अंगणवाडी सेविकांनी यासंदर्भात आंदोलनेदेखील केली होती. दरम्यान, नवे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनादेखील  महापौर आणि नगरसेवकांनी साकडे घातले होते, त्यानुसार त्यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.  त्यामुळे सेविका आणि मदतनिसांना दिलासा मिळण्याची शक्यता  आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा