शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या  मनुष्यबळाचा सामना करणाऱ्या  नाशिक महापालिकेत वर्षभरात १३३ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:19 IST

दोघांचा राजीनामा : सात वरिष्ठ अधिकाऱ्यानी पत्करली स्वेच्छानिवृत्ती

ठळक मुद्देआर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या  नाशिक महापालिकेला घटत्या मनुष्यबळाचीही चिंता येत्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणावर महापालिका रिकामी होण्याची भीती

नाशिक - आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या  नाशिक महापालिकेला घटत्या मनुष्यबळाचीही चिंता भेडसावू लागली असून सन २०१७ मध्ये १३३ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय, दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यानी राजीमाने दिले असून तब्बल सात वरिष्ठ अधिकाऱ्यानी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला आहे. एकीकडे नोकरभरतीची मागणी करणाऱ्या  लोकप्रतिनिधींकडून महासभांमध्ये मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीला हिरवा कंदील दाखविण्याचे काम सुरू आहे.महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या  कर्मचाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये निवृत्त होणाऱ्या  कर्मचाऱ्याची संख्या १३३ इतकी आहे. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यासह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. वर्षभरात १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिकाऱ्या नी राजीनामे दिले आहेत तर शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यु. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला आहे. येत्या महिनाभरात आणखी काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय, सहा महिन्यांनी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त होणार असून येत्या दीड वर्षात उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, उपआयुक्त रोहिदास बहिरम यांचाही सेवा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणावर महापालिका रिकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी