पेठरोडला १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

By Admin | Updated: June 2, 2014 00:30 IST2014-06-01T23:31:44+5:302014-06-02T00:30:14+5:30

संशयित पसार : पोलीसात गुन्हा दाखल

The 13-year-old daughter of Pethorod has a lot of rapes | पेठरोडला १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

पेठरोडला १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

संशयित पसार : पोलीसात गुन्हा दाखल

पंचवटी : पेठरोडवरील नवीन मार्केट यार्ड परिसरातील मक्यातील शेतात भरदिवसा एका १३ वर्षीय मुलीवर नराधमाने जबरीने अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठरोडवरील झोपडप˜ीत राहणारी १३ वर्षीय बालिका ही काल दुपारी नवीन बाजारसमितीलगत असलेल्या शेतात गवत आणण्यासाठी गेली असता संशयिताने तिला तु माझ्या समवेत गवत आणण्यासाठी पुढे चल असे सांगितले व परिसरातील मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला त्यानंतर संशयिताने पलायन केले. सदर घटना घडल्यानंतर पिडीत मुलीने सदरचा प्रकार तिच्या कुटूंबियांना सांगितला त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडला प्रकार पोलीसांना सांगितला व पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार पोलीसात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जबरीने अतिप्रसंग करून संशयित पसार झाल्याने संशयिताचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलीसांना कसोटी करावी लागणार आहे. (वार्ताहर)


उशिराने गुन्हा दाखल
काल दुपारच्या सुमाराला पेठरोडवरील तेरा वर्षीय मुलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्वत: पिडीत मुलीने पोलीसात धाव घेतली होती. घटना घडल्यानंतर सात ते आठ तासांचा कालावधी लोटल्यानंतर पंचवटी पोलीसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीसांच्या कामकाजाविषयी तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे. घटना घडल्यानंतर सदर मुलीच्या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल करून घेणे गरजेचे असतांना पंचवटी पोलीसांनी उशिराने गुन्हा का दाखल केला याचे कारण गुलदस्त्याच आहे. दरम्यान एकीकडे घटना घडल्याच्या वृत्ताला पोलीसांनीच दुजोरा दिला असला तरी दुसरीकडे रात्री पोलीसच कोणतीही नोंद नसल्याचे सांगत होते.

Web Title: The 13-year-old daughter of Pethorod has a lot of rapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.