ााशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये १३१ जिल्हा न्यायाधीश, १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, तर १८१ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे़ या बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ न्यायाधीश बदली झाली असून, १७ न्यायाधीश बदलून आले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल मंगेश पाटील यांनी या बदल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील एऩ के.ब्रह्मे यांची पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर, एम़ एस़ पठाण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, मालेगावमधील एस़एसख़डांगळे यांची नागपूर, तर आऱएस़तिवारी यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयात पुणे येथून एऩजी. गिमेकर, मुंबईहून एम़एस़बोधनकर यांची, तर मुंबई येथील ए़एस़महात्मे यांची मालेगाव व लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एस़ सी़ मगरे यांची निफाड येथे बदली करण्यात आली आहे़
जिल्ह्यातील १३ न्यायाधीशांच्या बदल्या
By admin | Updated: April 29, 2017 21:41 IST