भुयार गटार योजनेसाठी १३ कोटी मंजूर
By Admin | Updated: March 30, 2016 23:52 IST2016-03-30T23:51:20+5:302016-03-30T23:52:01+5:30
भुयार गटार योजनेसाठी १३ कोटी मंजूर

भुयार गटार योजनेसाठी १३ कोटी मंजूर
देवळाली : स्मार्ट छावणी परिषदेकडे वाटचाल सुरूनाशिक : स्मार्ट कॅन्टोन्मेंटच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देवळालीच्या भुयार गटार योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून, भुयार गटारीसाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. विशेष म्हणजे देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी २० कोटी रुपये निधी विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी एकट्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी १३ कोटी ८८ लाख इतका निधी मंजूर झाल्याचे खासदार हेमंत गोडसे यांचे म्हणणे आहे. देवळालीच्या इतिहासात प्रथमच इतका निधी मंजूर झाला आहे.
‘स्मार्ट देवळाली’ साठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रथमपासूनच आग्रही भूमिका ठेवली आहे. सन २०१२ मध्ये देवळाली कॅन्टोेंन्मेंट बोर्डाने १५० कोटी रुपये खर्चाची भुयारी गटार योजना नागरी व लष्करी विभागासाठी मंजूर करत ती सदर्न कमांड पुणे व डायरेक्टर जनरल नवी दिल्ली यांच्याकडे पाठविली होती. योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र या योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात होणे गरजेचे होते.
या कामी खासदार गोडसे यांनी संरक्षण व वित्त मंत्रालयाला योजनेचे महत्त्व पटवून देऊन योजना मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पहिल्या टप्प्यातील ६४ कोटीपैकी ५८ कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी देण्यात येऊन २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात १३ कोटी ८८ लाख रुपये खर्चाचा निधी वितरित करण्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)