जनकल्याण सेवा समितीतर्फे स्मशानभूमीत १३ बाके मोफत
By Admin | Updated: January 2, 2016 23:30 IST2016-01-02T23:28:06+5:302016-01-02T23:30:53+5:30
जनकल्याण सेवा समितीतर्फे स्मशानभूमीत १३ बाके मोफत

जनकल्याण सेवा समितीतर्फे स्मशानभूमीत १३ बाके मोफत
येवला : शहरातील जनकल्याण सेवा समितीच्या वतीने येवल्यातील स्मशानभूमीची सुधारणा करून बसण्याकरिता बाके बसविण्यात आली.
यापूर्वीही जनकल्याण
सेवा समितीच्या वतीने स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली होती. मात्र बसण्यासाठी बाके कमी पडत असल्याने समितीच्या सदस्यांनी स्वखर्चाने नववर्षाची भेट म्हणून येवला स्मशानभूमीत १३ नवीन बाके बसविण्यात आली. समितीचे अध्यक्ष नारायण शिंदे, किशोर कुमावत, दिगंबर कुलकर्णी, सुधीर गुजराथी, दत्ता नागडेकर, विजय पोंदे, दिलीप पाटील, गजानन गायकवाड, यांनी स्वखर्चाने येथील बाके बनवून स्मशानभूमीला भेट दिली. या प्रसंगी येवला नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्रभाकर झळके, नंदलाल भांबारे, साहेबराव मढवई, लक्षमण करमासे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)