१२५४ मतदारांनी वापरला नकाराधिकार
By Admin | Updated: October 21, 2014 01:56 IST2014-10-21T01:31:04+5:302014-10-21T01:56:20+5:30
१२५४ मतदारांनी वापरला नकाराधिकार

१२५४ मतदारांनी वापरला नकाराधिकार
मालेगाव : येथील मालेगाव बाह्य मतदारासंघात एक लाख ८० हजार ९१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात एक हजार २५४ जणांनी नकाराधिकाराचा वापर केला. यात दोन टपाल मतांचा समावेश आहे.
दोन लाख ९८ हजार ५९७ मतदार असलेल्या बाह्य मतदारसंघात दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यासाठी २९८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. त्यात एक लाख ८० हजार ९१० मतदारांनी मतदान केले. झालेल्या मतदानात एक हजार २५४ मतदात्यांनी पसंतीचा उमेदवार नसल्याने नकाराधिकाराचा वापर केला. यात १२५२ मतदान यंत्रावर
तर दोन पोस्टल मतांचा समावेश
आहे. निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
कारण मतदान यंत्रात नकाराधिकाराचा समावेश करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध
केला होता. त्यांनी नागरिक यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करतील त्यामुळे अनागोदी माजेल असे कारण पुढे केले होते. मात्र मतदात्यांनी त्यांचा अंदाज खोटा ठरविला असल्याचे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत नकाराधिकार वापरण्याचे प्रमाण पाहता नागरिकांचा मतदान करण्यावर जास्त विश्वास असल्याचे सिद्ध होते. (प्रतिनिधी)