शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 20:20 IST

नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे

ठळक मुद्देदिवसभरात जिल्हयात १ हजार २७२ संशियत रुग्ण

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. दिवसभरात १२ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता बळींचा एकूण आकडा ९३३ झाला. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.सण-उत्सवांचा काळात शहरासह जिल्ह्यता अचानकपणे कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने आता प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. दिवसभरात जिल्हयात १ हजार २७२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ८५ रु ग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. रविवारी शहरात ७६८ तर ग्रामिण भागात ३५१ आणि मालेगावात ५३ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला. त्यापैकी ८ मनपा नाशिक शहरातील ग्रामिणमध्ये ३ व मालेगावात १ रुग्ण मृत्यूमुखी पडला. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती. दीडशे ते पावणेदोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत होते; मात्र रविवारी पुन्हा रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहचली. एकूणच शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुकापातळीवरसुध्दा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६६ रुग्ण बरे झाले आहेत तर ७ हजार ६९१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ५३७ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ३६६ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस