थकबाकी वसुलीपोटी १२ टॉवर सील
By Admin | Updated: March 19, 2017 00:58 IST2017-03-19T00:57:48+5:302017-03-19T00:58:02+5:30
नाशिकरोड : मोबाइल कंपनीच्या टॉवर कराबाबत न्यायालयाने मनपाकडून निकाल दिल्यानंतर मनपाकडून दोन दिवसांत टॉवर कराच्या दीड कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी १२ मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहे.

थकबाकी वसुलीपोटी १२ टॉवर सील
नाशिकरोड : मोबाइल कंपनीच्या टॉवर कराबाबत न्यायालयाने मनपाकडून निकाल दिल्यानंतर मनपाकडून दोन दिवसांत टॉवर कराच्या दीड कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी १२ मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहे.
मनपा हद्दीत मोबाइल कंपन्यांकडून उभारलेल्या टॉवरला मनपाने टॉवर कर आकारणी केली होती; मात्र मनपाने केलेल्या कर आकारणीच्या विरोधात मोबाइल कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वीच सदर दाव्याचा निकाल मनपाच्या बाजूने लागला. मार्च एण्डींगमुळे मनपाकडून घरपट्टी, पाणीपट्टी आदि करांच्या थकबाकी वसुलीपोटी जोरदार मोहीम राबविली जात आहे.
मोबाइलचे १२ टॉवर सील
मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सहाय्यक अधीक्षक संजय पगार व इतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवार-शनिवारी नाशिकरोड भागातील मोबाइल टॉवर कर थकबाकी वसुलीपोटी मोहीम हाती घेतली होती. यामध्ये जयभवानी रोड, गुलमोहर कॉलनी, पाटोळे मळा, विहितगाव सौभाग्यनगर, विजय प्रभा अपार्टमेंट, जेलरोड ब्रह्मगिरी सोसायटीतील एका बंगल्यावर, जेलरोड, शिवाजीनगर बंगल्यावरील टॉवर, दत्तमंदिर सिग्नल, कलंत्री मंगल कार्यालय, सिन्नरफाटा ओढा रोड उड्डाणपुलाजवळील एका बंगल्यावर, जेलरोड भीमनगर, श्रमसाफल्य अपार्टमेंट, लॅमरोड, सौभाग्यनगर, ठाकूर प्लाझा, दत्तमंदिर रोड, जयभवानी रोड, जाचकनगर, आयर्न प्लाझा, मोटवानीरोड, लोकमान्यनगर, लोटस व्हीला अपार्टमेंट, जेलरोड, दसक, सातभाईनगर आदि ठिकाणी १२ टॉवर असलेल्या संबंधित मोबाइल कंपन्यांकडे मनपाचा सुमारे दीड कोटीचा टॉवर कर थकबाकी असल्याने त्यांना सील करण्यात आले. (प्रतिनिधी)