जिल्ह्यात १२ नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:30 PM2020-05-10T22:30:12+5:302020-05-10T22:30:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा १२ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात येवला ६, ...

12 new affected in the district | जिल्ह्यात १२ नवीन बाधित

जिल्ह्यात १२ नवीन बाधित

Next
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : येवला नवा हॉटस्पॉट, सिन्नरचे दोघे रोग मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा १२ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात येवला ६, दिंडोरी ३, सटाणा, मनमाड, मालेगाव, सिन्नरफाटा, नाशिक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६३६ वर पोहोचली. दरम्यान सिन्नर तालुक्यातील दोघेजण रोगमुक्त झाले असून त्यांची घरवापसी झाली आहे.
रविवारी सकाळी आलेल्या अहवालात ४६ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. हे तीन रुग्ण मालेगाव, सिन्नर आणि नाशिक शहरामधील प्रत्येकी एक याप्रमाणे होते.
सायंकाळी आलेल्या ७२ ैअहवालांमध्ये ५९ अहवाल निगेटिव्ह आले. नऊ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर आधीच्या दोन रुग्णांचे दुसरे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.
सिन्नर तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथे मागील महिन्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले असून, कोरोनामुक्त या दोघांची रविवारी घरवापसी झाली. या कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना आरोग्य विभागाने आज पाथरे येथे रुग्णवाहिकेत पोहोच केले.
मालेगावातून पेठला दोघे दाखल
पेठ येथील देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी मालेगाव शहरातून दोन नागरिक पेठ येथे दाखल झाल्याने संबंधित दुकान ज्या परिसरात आहे तेथील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर दुकान बंद करून संबंधित दुकान मालक पिता पुत्रावर पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ शहरात बिअरबार व देशी दारूचे दुकान असलेला मालक मूळ मालेगाव शहरातील राहणारा असून, लॉकडाउन झाल्यानंतर दुकान बंद झाल्याने ते मालेगावला निघून गेले. आता मालेगाववरून व्यवसायासाठी दोघेही पेठला दाखल झाले. याबाबत पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासन या पितापुत्रास मालेगावला परत पाठवते की विलगीकरण कक्षात रवानगी करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.पाथरेकर झाले कोरोनामुक्तसिन्नर तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथे पहिले कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. पाठोपाठ एकाच कुटुंबातील दुसरी व्यक्ती कोरोनाबाधित सापडली होती. सिन्नर तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, वावीचे आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका, कर्मचारी यांनी पाथरे ग्रामस्थांची, कुटुंबांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली. पाथरेकर पूर्णत: निगेटिव्ह झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ग्रामस्थांनी शासनाच्या सूचनांचे पालन केले. पुन्हा अशा प्रकारचे कोरोना रुग्ण वाढणार नाही यासाठी ग्रामस्थांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.मनमाडला पोलीस पॉझिटिव्हमनमाड शहरात दोन रु ग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यात एक महिला आणि एका पोलिसाचा समावेश आहे. शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा दोन
रु ग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली.
यामुळे प्रशासनावरील ताणदेखील वाढला आहे. यापैकी एक वृद्ध महिला असून, दुसरा रुग्ण पोलीस आहे. हा पोलीस मालेगाव येथे कर्तव्य बजावत होता. त्यानंतर तो आजारी पडला. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: 12 new affected in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.