बारा लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:36 IST2017-10-07T01:36:44+5:302017-10-07T01:36:53+5:30
महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

बारा लाखांचा माल जप्त
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेल राजे पार्क या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी अचानक तपासणी केली असता, या ठिकाणी विना परवाना मद्याची विक्री तसेच साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. पूर्वी या हॉटेलला परमिट रूमचा परवाना होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तेथील परवाना निलंबित करण्यात आलेला असतानाही हॉटेल मालक सचिन घारे (रा. हरसुले, सिन्नर) हे दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने छापा मारला. या ठिकाणी होडका, मॅकडॉल, ब्लेंडर स्प्राईड यांसारख्या दारूचे लाखो रुपये किमतीचे बारा बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. घारे यांच्या मालकीचीच पीकअप मोटार दुसºया एका भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर नजिकच्या अंबोलीजवळ पकडली असता त्यातही मोठ्या प्रमाणावर साठा सापडला आहे. या संपूर्ण मोहिमेत दादरा नगरहवेली या राज्यातच विक्रीसाठी मान्यता असलेले ट्युबर्ग स्ट्रॉँग बिअर, किंगफिशर अशा सुमारे बारा लाख ५५ हजार ३५८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप देशमुख, नाना सातपुते, राहुल ऊर्फ सागर आव्हाड, मंगेश मोनवे व सचिन घारे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.