जिल्हा रुग्णालयाच्या १२ शवपेट्या नादुरुस्त
By Admin | Updated: March 29, 2015 00:34 IST2015-03-29T00:33:35+5:302015-03-29T00:34:13+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या १२ शवपेट्या नादुरुस्त

जिल्हा रुग्णालयाच्या १२ शवपेट्या नादुरुस्त
नाशिक : जिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी असलेल्या शवागृह (कोल्ड स्टोअरेज) यंत्रणेकडे देखभाल करणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे ४८ शवपेट्यांपैकी १२ शवपेट्या कॉम्प्रेसर बंद झाल्याने नादुरुस्त आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडण्याची चिन्हे असून, संबंधित कंपनीकडून देखभालीची जबाबदारी का काढून घेतली जात नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत़
नाशिक जिल्हा रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खाटा असलेले रुग्णालय असून, जिल्ह्यासह ठाणे, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील रुग्णही या ठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात़ याबरोबरच अपघात, अकस्मात मृत्यू, बेवारस मृतदेह, उपचारादरम्यान होणाऱ्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातच शवागृह तयार करण्यात आले असून, त्यामध्ये ४८ शवपेट्या आहेत़