तब्बल ११७ अर्ज दाखल नाशिक कृउबा निवडणूक
By Admin | Updated: June 24, 2015 01:49 IST2015-06-24T01:48:35+5:302015-06-24T01:49:01+5:30
तब्बल ११७ अर्ज दाखल नाशिक कृउबा निवडणूक

तब्बल ११७ अर्ज दाखल नाशिक कृउबा निवडणूक
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि.२३) तब्बल ११७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. अंतिम दिवसापर्यंत आता एकूण १८ जागांसाठी २३३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या २५ जूनला अर्जांची छाननी करण्यात येणार असून ९ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या अर्जांची संवर्गनिहाय संख्या पुढीलप्रमाणे- सोसायटी गटातील सर्वसाधारण संवर्गाच्या जागांसाठी ८३, महिला राखीव गटाच्या जागेसाठी १७, इतर मागास प्रवर्ग संवर्गासाठी-१७, भटक्या विमुक्त जाती-जमाती संवर्गासाठी-१५, ग्रामपंचायत गटाच्या जागांसाठी-२६, आर्थिक दुर्बल गटासाठी-१४, अनूसूचित जाती-जमाती गटाच्या जागेसाठी-२२, व्यापारी व अडते संवर्गाच्या जागेसाठी-३६, हमाल गटाच्या जागेसाठी-५ अशा एकूण २३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ११७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात जिल्हा बॅँक संचालक शिवाजी चुंभळे, स्व. केरू चुंभळे यांचे चिरंजीव रत्नाकर चुंभळे, मुरलीधर पाटील, विलास कांडेकर, अंबादास घुगे,रवींद्र भोये, महादू नारळे, शंकर कसबे, नीलेश पेखळे, राजन दलवाणी, राजेंद्र भोरे, रंगनाथ करंजकर, आवेज कोकणी, संदीप पाटील, सुदर्शन पाटील, सुनील खोेटरे, चंद्रकांत खोेडे, सुनील खोडे, संदीप गायकर, प्रकाश आल्हाट, वासाळीचे माजी सरपंच शांताराम नामदेव चव्हाण, सुनीता चव्हाण यांच्यासह ११७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुरंगी लढत होते की तिरंगी हे चित्र स्पष्ट होणार आहे.(प्रतिनिधी)