११,५०० उमेदवार देणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

By Admin | Updated: April 1, 2017 20:44 IST2017-04-01T20:44:42+5:302017-04-01T20:44:42+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक आदि वर्ग-१ व वर्ग-२ च्या विविध पदांसाठी रविवारी (दि.२) राज्य सेवा पूर्व परीक्षा

11,500 candidates will be given State Service Pre-Examination | ११,५०० उमेदवार देणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

११,५०० उमेदवार देणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक आदि वर्ग-१ व वर्ग-२ च्या विविध पदांसाठी रविवारी (दि.२) राज्य सेवा पूर्व परीक्षा देणार आहेत. शहरातील ३१ केंद्रांवर सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थीही परीक्षा देणार आहेत.
या परीक्षेसाठी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर सुमारे एक लाख ९८ हजार उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. सकाळी ११ वाजता व दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या प्रत्येकी दोन तासांच्या दोन पेपरच्या या परीक्षेची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हा प्रशासनांच्या मदतीने पूर्ण केली आहे. सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रं पाठविण्यात आली असून, सुमारे दहा हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक अशा कामांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली या परीक्षा होणार आहे. आयोगातून विशेष निरीक्षक, भरारी पथके पाठविली जाण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती आयोगातर्फे कळविण्यात आली आहे.

Web Title: 11,500 candidates will be given State Service Pre-Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.