114 new patients in Chandwad in two days | चांदवडला दोन दिवसांत ११४ नवीन रुग्ण

चांदवडला दोन दिवसांत ११४ नवीन रुग्ण

ठळक मुद्दे १०९ पैकी ५४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह

चांदवड : येथे १३ एप्रिल रोजी १०५ पैकी ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर १४ एप्रिल रोजी १०९ पैकी ५४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांतील आहेत तर आसरखेडे, दरसवाडी, दरेगाव, डोणगाव, दुगाव, हिरापूर, खेलदरी, कोकणखेडे, निंबाळे, पन्हाळे, परसुल, पाटे, रायपूर, शिरुर, उधरुळ,उसवाड, वडबारे, वडनेरभैरव, वाहेगावसाळ, गणूर , रेडगाव, शिंगवे, तर दहिवद, दरेगाव, दुगाव, गणूर , काळखोडे, मालसाणो, मेसनखेडे, नारायणगाव, निमोण, परसुल, राहुड, शेलु, तळवाडे, वडबारे आदी एकूण ११४ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

Web Title: 114 new patients in Chandwad in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.