ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात ११०० पोलिसांचा बंदोबस्त
By Admin | Updated: September 13, 2016 01:39 IST2016-09-13T01:39:03+5:302016-09-13T01:39:18+5:30
ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात ११०० पोलिसांचा बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात ११०० पोलिसांचा बंदोबस्त
नाशिक : गणेशोत्सव व मुस्लीम बांधवाची बकरी ईद मंगळवारी (दि़१३) शहरात साजरी केली जाणार आहे़ हिंदू व मुस्लीम समाजातील या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आयुक्तालयात सुमारे ११०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
पोलीस आयुक्तालयात लावण्यात येणाऱ्या या बंदोबस्तामध्ये २८ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक पोलीस निरीक्षक, ८८९ पोलीस कर्मचारी, ७३ महिला पोलीस तर एसआरपीएफच्या तीन तुकड्यांचा समावेश आहे़ गोल्फ क्लबजवळील इदगाह मैदानावर ९ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरीक्षक, ११३ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़ या बंदोबस्ताव्यतिरिक्त गुन्हे व विशेष शाखेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली, पंचवटी, अंबड, नाशिकरोड, आडगाव, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही स्थानिक पातळीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिले आहेत.