शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले

By श्याम बागुल | Updated: March 22, 2023 18:17 IST

चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

नाशिक : नाशिक शहरातील वाढती लोकसंख्या व त्यासाठी देण्यात आलेले नळ कनेक्शन पाहता घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च येतो या खर्चाच्या मोबदल्यात फक्त ५० टक्केच पाणीपट्टी वसूल होत आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. 

महापालिकेच्या हद्दीतील सहाही विभागाचा विस्तार होत असून, नवनवीन वसाहती उभ्या राहत असल्याने साऱ्यांच्याच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला करावी लागत आहे. नवीन पाइपलाइन व जलकुंभांच्या निर्मितीतून सध्या सुमारे दोन लाख घरांना पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांना वेळेवर व नियमित पुरेसा पाणीपुरवठा करण्याकामी उभ्या केलेल्या यंत्रणेवर तसेच धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापोटी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च करावे लागतात. 

मात्र, त्या तुलनेने पाणीपट्टी कमी वसूल होते. घरगुती, व्यावसायिक व व्यावसायिक संस्थांसाठी पाण्याचे दर वेगवेगळे असले तरी, हजारो लोक पाणीपट्टी नियमित भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, दरवर्षी महापालिकेला येणे असलेले पाणीपट्टीचे उत्पन्न घटू लागले आहे. साधारणत: दरवर्षी ५० टक्क्यापर्यंत पाणीपट्टी वसूल होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी