वाढदिवसाचा खर्च टाळत वृक्षसंवर्धनासाठी 11 हजारांची मदत

वाढदिवसाचा खर्च टाळत वृक्षसंवर्धनासाठी 11 हजारांची मदत

ठळक मुद्देवनप्रस्थ फाउंडेशनला 11 वटवृक्ष, 11 ट्री गार्ड व रोख 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली.

सिन्नर: सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे तालुकाध्यक्ष वामनराव पवार यांनी वाढदिवस साजरा न करता वनसंवर्धनाचे काम करणार्‍या वनप्रस्थ फाउंडेशनला 11 हजारांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.
वाढदिवस साजरा न करता वामन पवार यांनी सोनांबे येथील वनप्रस्थ फाउंडेशनने हाती घेतलेल्या आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. वाढदिवसानिमित्त वनप्रस्थ फाउंडेशनला 11 वटवृक्ष, 11 ट्री गार्ड व रोख 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे वामनराव पवार यांचे सोनांबेकरांनी आभार मानले. पवार यांच्याप्रमाणेच दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन समाजात आदर्श निर्माण करत वनप्रस्थ फाउंडेशनने हाती घेतलेल्या आई भवानी डोंगरावरील वृक्षारोपणात कृतिशील सहभाग नोंदवावा, असे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: 11 thousand help for tree planting avoiding birthday expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.