तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी ११ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2016 00:34 IST2016-07-06T23:28:24+5:302016-07-07T00:34:54+5:30
तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी ११ जणांवर गुन्हा

तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी ११ जणांवर गुन्हा
नाशिकरोड : शाळा-महाविद्यालय पासून १०० मीटर अंतरात सिगारेट, तंबाखू उत्पादित वस्तू विकणाऱ्या ११ जणांविरुद्ध नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळा-महाविद्यालय याच्या आजूबाजूला १०० मीटर अंतरात सिगारेट, तंबाखू वस्तू विकण्यास बंदी आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलिसांनी शाळा-महाविद्यालयाजवळ सिगारेट, तंबाखू वस्तू विकणाऱ्या प्रमोद रमेश कोमरे, अन्तोन श्यामराव केदारे, राहुल गंगाधर भालेराव, जितेंद्र हारतचंद्र छाजेड, नवनाथ गोपाळ सोसे, विजय रामदास गिते, जयवंत रघुनाथ पगारे, विशाल बाबूराव व्यवहारे, महादेव श्यामराव जुन्नरे, तिरोना अशोक आहिरे, वनिता उत्तम पगारे या ११ जणांविरुद्ध तंबाखू उत्पादित वस्तू विक्री कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)