सोयगाव : मालेगाव शहरातील हनुमान वाडीजवळ असलेल्या बालाजी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी सोयगाव मार्केटमधील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली असून यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.मंगळवारी (दि.१८) रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अमृतलाल माधवलाल पटेल रा. हनुमानवाडी सोयगाव मूळ रा. कासा बिशनगर, जि. मेहसाना गुजरात या व्यापाऱ्याने कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकारची दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. व्यापारी अमृतलाल पटेल आपले काम संपवून घरी आले. त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्यानी त्यांचा पाठलाग केला. व्यापारी पटेल यांनी आपल्या दुचाकी क्र. एमएच ४१ वाय ९६०९ या वाहनाच्या डिक्कीत कापडाच्या पिशवीत ११ लाखांची रक्कम ठेवली होती. ती चोरट्यानी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कॅम्प पोलिसांत धाव घेतली. कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
मालेगावी व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 00:39 IST
सोयगाव : मालेगाव शहरातील हनुमान वाडीजवळ असलेल्या बालाजी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी सोयगाव मार्केटमधील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली असून यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
मालेगावी व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली
ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.