शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:42 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील ११ कोविड केअर सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत तर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिलासा : नॉनकोविड रुग्ण, फीव्हर क्लीनिकमध्ये रूपांतर

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील ११ कोविड केअर सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत तर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये अधिग्रहीत केले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचे संशयित रुग्णांना केअर सेंटरमध्ये तर प्रकृती गंभीर असलेल्यांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाला अटकाव करण्यासाठी हे सेंटर उपयोगी ठरले होते. हजारो रुग्णांवर या ठिकाणी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यात आले, त्यामुळे हे सेंटर कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले होते. जानेवारीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून, विशेष करून ग्रामीण भागात प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून कार्यरत कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यात ११ कोविड  सेंटर बंद करण्यात आले असून, काही सेंटर कोविडसाठी बंद करण्यात येऊन आठ ठिकाणी फीवर क्लिनिक सेंटर सुरू करण्याचे आदेश आहेेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्याही खाटा कमी करण्यात येऊन त्यात काही खाटा नॉनकोविड रुग्णांसाठी राखीव  आहेत. बंद कोविड सेंटरमध्ये देवळाली कॅम्प, इगतपुरीची एकलव्य आश्रमशाळा, दिंडोरी येथील बोपेगाव शासकीय आश्रमशाळा, अजमेर सौदाणे येथील एकलव्य आश्रमशाळा, साकोरे येथील सारताळे आश्रमशाळा, नांदगावच्या सेंट झेविअर स्कूल, येवला येथील आदिवासी विकास वसतिगृह, दाभाडी येथील हिरे विद्यालय, लासलगाव महावीर स्कूल, लासलगाव ग्रामीण रूग्णालय, देवळा येथील विद्यानिकेत स्कूलचा समावेश आहे. जिल्ह्यात १०२ जणांनी केली कोरोनावर मातजिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) एकूण १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५२ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असल्याने बळींची संख्या २०४७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ४३२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १२ हजार ०६३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३२२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ९६ हजार ४६८ असून, त्यातील ३ लाख ७७ हजार ६८२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १५ हजार ४३२ रुग्ण बाधित आढळून आले असून, ३३५४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. या ठिकाणी होणार फीव्हर क्लिनिकसटाणा येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह, कळवणच्या मानूर येथील शासकीय वसतिगृह, पेठचे आदिवासी वसतिगृह, देेवळा येथील वसतिगृह या ठिकाणी कोविड केअर सेंटर बंद करून फीव्हर क्लिनिक सेंटर सुरू करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या