जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:41 AM2021-01-30T01:41:38+5:302021-01-30T01:42:12+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील ११ कोविड केअर सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत तर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

11 Kovid Care Centers closed in the district | जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद

जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद

Next
ठळक मुद्देदिलासा : नॉनकोविड रुग्ण, फीव्हर क्लीनिकमध्ये रूपांतर

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील ११ कोविड केअर सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत तर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
   जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये अधिग्रहीत केले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचे संशयित रुग्णांना केअर सेंटरमध्ये तर प्रकृती गंभीर असलेल्यांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाला अटकाव करण्यासाठी हे सेंटर उपयोगी ठरले होते. हजारो रुग्णांवर या ठिकाणी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यात आले, त्यामुळे हे सेंटर कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले होते. जानेवारीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून, विशेष करून ग्रामीण भागात प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून कार्यरत कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यात ११ कोविड  सेंटर बंद करण्यात आले असून, काही सेंटर कोविडसाठी बंद करण्यात येऊन आठ ठिकाणी फीवर क्लिनिक सेंटर सुरू करण्याचे आदेश आहेेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्याही खाटा कमी करण्यात येऊन त्यात काही खाटा नॉनकोविड रुग्णांसाठी राखीव  आहेत. 
बंद कोविड सेंटरमध्ये देवळाली कॅम्प, इगतपुरीची एकलव्य आश्रमशाळा, दिंडोरी येथील बोपेगाव शासकीय आश्रमशाळा, अजमेर सौदाणे येथील एकलव्य आश्रमशाळा, साकोरे येथील सारताळे आश्रमशाळा, नांदगावच्या सेंट झेविअर स्कूल, येवला येथील आदिवासी विकास वसतिगृह, दाभाडी येथील हिरे विद्यालय, लासलगाव महावीर स्कूल, लासलगाव ग्रामीण रूग्णालय, देवळा येथील विद्यानिकेत स्कूलचा समावेश आहे. 
जिल्ह्यात १०२ जणांनी केली कोरोनावर मात
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) एकूण १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५२ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असल्याने बळींची संख्या २०४७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ४३२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १२ हजार ०६३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३२२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ९६ हजार ४६८ असून, त्यातील ३ लाख ७७ हजार ६८२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १५ हजार ४३२ रुग्ण बाधित आढळून आले असून, ३३५४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 
या ठिकाणी होणार फीव्हर क्लिनिक
सटाणा येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह, कळवणच्या मानूर येथील शासकीय वसतिगृह, पेठचे आदिवासी वसतिगृह, देेवळा येथील वसतिगृह या ठिकाणी कोविड केअर सेंटर बंद करून फीव्हर क्लिनिक सेंटर सुरू करण्यात येत आहे.

Web Title: 11 Kovid Care Centers closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.