११ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:11 IST2017-09-10T23:36:52+5:302017-09-11T00:11:15+5:30
माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

११ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर
दाभाडी : माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचे जाहीर केले. नाशिक जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. यासाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्यांबरोबर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे.
थेट सरपंच निवडीबाबत मतदारांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या असून, गावपातळीवरील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाºया उमेदवाराला राजकीय पक्षाचे चिन्ह मिळणार नसून आयोगाने निश्चित केलेल्या मुक्त चिन्हातून प्रथमत: कोणतेही एक निवडणूक चिन्ह मिळणार आहे. या निवडणुकीपासून सरपंचाला सर्वाधिक अधिकार व पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड असल्याने गाव कट्ट्यावर अनेक चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीत मतदाराला कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त चार मते द्यावी लागणार आहेत. सरपंचपदासाठी मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल, तर सदस्यांसाठी पूर्वीप्रमाणे अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा, तर सर्वसाधारण जागेसाठी पांढरा रंग असणार आहे.