संत ज्ञानेश्वरनगर मित्रमंडळाचे १०९ बाटल्या रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST2021-09-16T04:20:06+5:302021-09-16T04:20:06+5:30
नाशिक : जेलरोड परिसरातील संत ज्ञानेश्वरनगर मित्रमंडळातर्फे आणि संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. १५) सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ...

संत ज्ञानेश्वरनगर मित्रमंडळाचे १०९ बाटल्या रक्तदान
नाशिक : जेलरोड परिसरातील संत ज्ञानेश्वरनगर मित्रमंडळातर्फे आणि संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. १५) सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल १०९ बाटल्या रक्तदान करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक विशाल संगमनेर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ नागरिक शिवाजी भालेराव, मधुकर विधाते, पंडित काशीकर, मधुकर चव्हाण, बी. एस. चित्ते, मधुकर कहाणे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये संजीवनी ब्लड बँकेचे डॉ. प्रदीप निकुंभ, राहुल जगदाळे, नीलिमा सुरस आणि राकेश गिते यांनी वैद्यकीय सुविधा दिली. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी दर्शन सोनावणे, राहुल बेरड, मनोज म्हस्के, सारंग येवले, शंतनू निसाळ, धनंजय लोखंडे, गोरख चकोर, शशिकांत शिंदे, सचिन रौंदळ आदींनी परिश्रम घेतले.