मनपाकडे १०६० पाळीव श्वानांची नोंदणी

By Admin | Updated: October 22, 2016 01:57 IST2016-10-22T01:57:21+5:302016-10-22T01:57:49+5:30

श्वानमालकांची उदासीनता : नोंदणीसाठी आवाहन

1060 pet dogs registration | मनपाकडे १०६० पाळीव श्वानांची नोंदणी

मनपाकडे १०६० पाळीव श्वानांची नोंदणी

नाशिक : महापालिकेमार्फत भटक्या व मोकाट श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बिजीकरणाच्या माध्यमातून उपाययोजना केली जाते याशिवाय पाळीव श्वानांपासून उद्भवणारे धोके लक्षात घेऊन श्वानमालकांना पाळीव श्वानांची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले जाते, परंतु शहरात आतापर्यंत केवळ १०६० पाळीव श्वानांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली असून, अनेक श्वानमालकांकडून रितसर लसीकरण करून नोंदणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. पाळीव श्वानांची नोंदणी करण्याचे आवाहन मालकांना केले आहे.
शहरातील पाळीव श्वानांची नोंदणी करणे श्वान मालकाला बंधनकारक आहे. महापालिकेमार्फत १०० रुपये शुल्क आकारून नोंदणी केली जाते. नोंदणी करताना श्वानांचा प्रकार, लसीकरण केले आहे किंवा नाही, श्वानमालकाची माहिती आदि माहिती संकलित केली जाते. घरात-बंगल्यात श्वान पाळताना त्याला लसीकरण बंधनकारक आहे. महापालिकेकडे आतापर्यंत १०६० पाळीव श्वानांची नोंद आहे. शहरात अनेक घरांमध्ये, बंगल्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने श्वान पाळले जाते, परंतु नोंदणीच्या बाबतीत श्वानमालकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. महापालिकेकडून आवाहन करूनही श्वानमालकांकडून प्रतिसाद दिला जात नाही.
पाळीव श्वानांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, श्वान निर्बिजीकरणाच्या ठेक्याची मुदत संपल्याने नवीन निविदाप्रक्रिया अंतिम होईपर्यंत ठेक्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत दोन डॉग व्हॅन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 1060 pet dogs registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.