ओझरमध्ये नवीन १०१ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:21 IST2021-04-14T21:22:40+5:302021-04-15T00:21:11+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर येथे बुधवारी (दि.१४) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. ओझरसह परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दररोज झपाट्याने मोठी वाढ होत असल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओझरमध्ये नवीन १०१ कोरोना रुग्ण
ओझरटाऊनशिप : ओझर येथे बुधवारी (दि.१४) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. ओझरसह परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दररोज झपाट्याने मोठी वाढ होत असल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओझरसह परिसरातील १०१ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण संख्या २८२४ झाली आहे. त्यापैकी ५१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर २०४८ रुग्ण बरे झाले आहेत. ७२६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ७५ जणांवर रूग्णालयात तर ६५१ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनची संख्या १४१९ झाली असून ६५६ झोन पूर्ण झाले तर ॲक्टिव्ह झोन ६६३ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.