शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:07 IST

शहरात पोषक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत स्मार्ट पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यासाठी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

नाशिक : शहरात पोषक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत स्मार्ट पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यासाठी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील बैठक झाली. हा आराखडा सुमारे शंभर कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा असणार आहे. तो यशस्वी झाल्यास नाशिकच्या धार्मिक-ऐतिहासिक स्थळांचे रूपडेच पालटणार आहे.  महापालिकेत झालेल्या या बैठकीस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राठोड, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पर्यटन विभागाचे अधिकारी नितीन मुंडावरे, तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने रामायण सर्किट अंतर्गत दंडकारण्यात आलेल्या नाशिक शहराची निवड केली आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर, सीतागुंफा, सीताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सीता सरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद अशी प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा असलेली अनेक ठिकाणे आहेत. रामायण सर्किटच्या माध्यमातून या पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला. यावेळी पर्यटन विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नाशिकमधील धार्मिक, ऐतिहासिक व अन्य पर्यटन स्थळांचे जतन, संवर्धन आणि काही ठिकाणी नूतनीकरण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आराखड्याचे प्रारूप तयार केल्यानंतर स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पर्यटन स्थळांची माहिती संकलित करणारया आराखड्याअंतर्गत पर्यटन स्थळांमध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करताना एकात्मिक स्वरूपात नाशिकच्या सर्व पर्यटन स्थळांची माहिती संकलित करून ती उपलब्ध करून देणे, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग करणे आणि त्यासाठी अ‍ॅप, मनपाची पर्यटन स्थळे यांचा वापर करणे, पर्यटनाच्या ठिकाणांबाबत माहिती व दिशादर्शक फलक लावणे, लोकसहभागातून पर्यटकांसाठी निवास व न्याहारीची व्यवस्था करणे याबरोबरच टूर आॅपरेटर आणि गाइड यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवास आणि न्याहारीच्या व्यवस्थेबाबत तसेच आदरातिथ्याबाबत खास मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटन