गोदावरी एक्सप्रेसने ‘श्रीं’ चे दहा दिवस अप-डाउन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:26 IST2018-09-13T17:25:16+5:302018-09-13T17:26:21+5:30
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये आज नगराध्यक्ष राजाभाउ अहिरे यांच्या हस्ते श्रीं ची विधीवत स्थापना क रण्यात आली.गोदावरी गणेश मंडळाचे यंदाचे २२ वे वर्ष असून दहा दिवस गणरायांचा चाकरमान्यांबरोबर मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास घडणार आहे.

गोदावरी एक्सप्रेसने ‘श्रीं’ चे दहा दिवस अप-डाउन !
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये आज नगराध्यक्ष राजाभाउ अहिरे यांच्या हस्ते श्रीं ची विधीवत स्थापना क रण्यात आली.गोदावरी गणेश मंडळाचे यंदाचे २२ वे वर्ष असून दहा दिवस गणरायांचा चाकरमान्यांबरोबर मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास घडणार आहे.गणरायाच्या स्वागतासाठी पास बोगीमधे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.या स्थापनेमुळे दैनंदीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज प्रवासात श्रीं च्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे , मुकेश निकाळे, संदिप व्यवहारे,धनंजय अव्हाड,संदिप आढाव, मंगेश जगताप,स्वप्नील म्हस्के,सुरज चौधरी,विशाल अहिरे,भुषण पवार यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहे.