शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 20:22 IST

जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे.

ठळक मुद्देनाशिक शहरात १ हजार ५० रुग्ण१ हजार ९३३ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित

नाशिक : शहरासह ग्रामिण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरु आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्ह्यात वाढले तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवारी उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावल्याने आता मृतांचा आकडा १ हजार ५०इतका झाला आहे. तसेच १ हजार ६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत.कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिकच उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले होते. त्यानंतर सलग दोन दिवसांत ३० रुग्ण मृत्युमूखी पडले. जिल्ह्यात दररोज दीड हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आता प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मागील आठवडाभरापासून शहरापाठोपाठ जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी नाशिक शहरात १ हजार ५०, ग्रामिणमध्ये ४४६ तर मालेगावात ७२ नवे कोरोनाचे रुग्ण मिळाले. यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे. यामध्ये शहरात ३५ हजार ९७४, ग्रामीणमध्ये १२ हजार ९८०, मालेगावात ३ हजार १२४ आणि जिल्ह्याबाहेरील २५१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १० हजार ४१५ रुग्ण सध्या उपचार घेत असून आतापर्यंत १लाख ३३ हजार ८४८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एकूण १ हजार ९३३ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी शहरात ५ तर ग्रामिणमध्ये ९ रुग्ण आणि जिल्हाबाहेरील १ अशा १५ रुग्णांंचा मृत्यू झाला. दिवसभरात जिल्ह्यात २ हजार ५८ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू