जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १८७ रु ग्णांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:16 IST2020-09-13T22:43:00+5:302020-09-14T01:16:13+5:30
नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.१३) नव्याने १ हजार १८७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता ५३ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १४ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ७७० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १८७ रु ग्णांना बाधा
नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.१३) नव्याने १ हजार १८७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता ५३ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १४ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ७७० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
रविवारी एकूण १४ रु ग्ण दगावले. त्यापैकी शहरातील ५ , ग्रामिणमध्ये ६, मालेगावात २ तर जिल्ह्यबाहेरील १ रु ग्ण मृत्युमुखी पडला. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा १ हजार ६४ वर पोहचला आहे. शहरात रविवारी ७४७, ग्रामिणमध्ये ३९५, मालेगावात ३४ आणि जिल्ह्याबाहेरील ११ कोरोनाबधित आढळून आले. नाशिक शहरात आतापर्यंत ५९४ तर ग्रामिणमध्ये ३१८ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत.
दिवसभरात जिल्हयात १ हजार १०४ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी ९२५ रु ग्ण केवळ नाशिक शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५३ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत ४१ हजार ६३४ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच १० हजार ८१८ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ४३३ नमुने चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.