शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

ठळक मुद्देवाढता कल : यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा व हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात पीकविम्याकडे शेतकरी गांर्भीयाने लक्ष देत नसल्याने या योजनांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत शासनस्तरावरून जनजागृती केली गेल्याने सध्या पीकविम्याकडे शेतकºयांचा कल वाढू लागलाआहे. यावर्षी पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९ हजार ८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. पीकविम्याअंतर्गत ८० हजार ६६७ हेक्टर, तर फळपिकाचे सात हजार ६२९ हेक्टर इतके क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीकविमा घेणाºयांमध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकºयांची संख्या (३६,००४) सर्वाधिक आहे, तर सटाणा तालुक्यात २४ हजार ९८९ शेतकºयांनी पीकविमा घेतला आहे.सन २०१९-२०च्या खरीप हंगामात जिल्ह्णात एकूण १ लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा घेतला होता. त्याअंतर्गत १ लाख ३१ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील पीक संरक्षित झाले होते. या पोटी ९ कोटी ६६ लाख रुपये शेतकरी हिस्सा होता. गतवर्षी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्यापोटी १८३ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता.तालुकानिहाय शेतकºयांची संख्यामालेगाव - ३६००५, सटाणा-२४९८९, नांदगाव - १६२३७ , कळवण - ३७८१, देवळा - ११२१५, दिंडोरी - ९८१, सुरगाणा - ४३९, नाशिक - १९४, त्र्यंबकेश्वर - १८५६, इगतपुरी - ३६०८,पेठ - ६२३४, निफाड -४०७७, सिन्नर - ११५३८ , येवला - ४९४३,चांदवड - ५९६८.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी