त्र्यंबकेश्वर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते धनादेश स्वीकारताना लाभार्थी बेबी दिनकर भालेराव. समवेत मुख्य अधिकारी डॉ. चेतना केरु रे, कैलास चोथे आदी.त्र्यंबकेश्वर : शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०६ लाभार्र्थींची प्रकरणे मंजूर झाली असून, पहिल्या टप्प्यात ५४ लाभार्थींना निधीचे वाटप करण्यात आले आहे, तर उर्वरित ५२ लाभार्र्थींनी वेळेवर कामाला सुरुवात न केल्याने पावसाळा संपल्यानंतर नियम व अटीनुसार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.आतापर्यंत घरकुलाच्या प्रगतीप्रमाणे ४८ लाभार्थींना केंद्र शासनाकडून प्रत्येकी एक लाख २० हजार व राज्य शासनाकडून ८० हजार रुपये असे एकूण २ लाख ४८ हजार रुपये, तर सहा लाभार्थींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले आहेत. हा सर्व निधी पीएफएमएसनुसार लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. घरकुल योजना प्रभावीपणे राबविणारी त्र्यंबक नगर परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव क वर्ग नगर परिषद असल्याचे राज्याचे नगरपालिका प्रशासन संचालक यांनी सांगितले. ते दोन महिन्यांपूर्वी घरकुल योजनेची पाहणी करण्याकरिता आले होते. यावेळी मुख्य अधिकारी डॉ. चेतना केरु रे उपस्थित होत्या.घरकुलासाठी आतापर्यंत५४ लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र शासनाकडून दीड लाख रु पये व राज्य शासनाकडून एक लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये लाभार्थींला मिळतात. त्यापैकी राज्य शासनाचा पहिला हप्ता चाळीस हजार रु पये व दुसराहप्ता चाळीस हजार रु पये असे ८० हजार रु पये लाभार्थींना १२ जूनपर्यंत मिळाले आहेत, तर केंद्र शासनाकडून आलेल्या निधीतून पहिला हप्ता ६० हजार व दुसरा हप्ता ६० हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपयेलाभार्थींच्या बँँक खात्यावर आॅनलाइन जमा करण्यात आले आहेत.दरम्यान आज प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वाटपासाठी आयोजित औपचारिक कार्यक्र मास नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, माजी प्र. नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार उपस्थित होते. प्रास्ताविक प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता अमित ब्राह्मणकार यांनी केले. यावेळी मुख्य अधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. भागवत लोंढे, स्वप्निल शेलार, विष्णू दोबाडे, हर्षल शिखरे, रवंींद्र सोनवणे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, सोनवणे, शीतल उगले आदी उपस्थित होते.
त्र्यंबकला घरकुलासाठी ५४ लाभार्थींना एक कोटी २० लाखांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:05 IST