शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही जि.प.चा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:53 IST2020-08-08T12:53:26+5:302020-08-08T12:53:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही आता खो मिळाला आहे. कोरोनाचे कारण देत या ...

शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही जि.प.चा ‘खो’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाही आता खो मिळाला आहे. कोरोनाचे कारण देत या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे. दरम्यान, राज्यात सर्वत्र बदल्या होत असतांना केवळ नंदुरबार जिल्हा परिषदेनेच का रद्द केल्या आहेत? यामुळे दुर्गम भागातील महिला शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे राज्य प्राथमिक परिषदेने म्हटले आहे.
कोरोनामुळे यंदा शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर १५ टक्के आॅफलाईन बदल्या करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यातही पुन्हा सुधारीत आदेश काढून आॅफलाईन बदल्या केवळ विनंती बदल्या कराव्या, प्रशासकीय बदल्या करू नये असे स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार जिल्हा परिषदेने मात्र आता आॅफलाईन विनंती बदल्या देखील रद्द करण्याचे पत्र राज्य शासनाला देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोविड च्या पार्श्वभुमीवर शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे बंधन ाहे. इतर क्षेत्रीय कर्मचारी, नागरिक यांना कार्यालयात येण्यास निर्बंध असल्याने अशा परिस्थितीत आॅफलाईन पद्धतीने विहित मुदतीत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मणुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे आॅफलाईन बदली प्रक्रिया राबवितांना बदलीसाठी उपस्थित मणुष्यबळाची आवश्यकता असेल. मणुष्यबळ, बदलीपात्र शिक्षकांची उपस्थिती, त्यांना बसविण्यात येणाºया अडचणी राहणार आहेत.
शिवाय विशेष संवर्ग १ मधील पात्र शिक्षक व ५३ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त गंभीर आजारी शिक्षकांचा समावेश असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समुपदेशन प्रक्रियेत सामाजिक अंतर पाळणे व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्यात येत असल्याचे या पत्रात सीईओ विनय गौडा यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे महाराष्टÑ शिक्षक परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा नंदुरबारपेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल्या जिल्ह्यात प्रक्रिया राबविली जात आहे. वास्तविक जिल्ह्यात विनंती बदली मागणारे केवळ ६० ते ७० जण आहेत. त्यात दुर्गम भागातील विस्थापीत महिला शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना याअंतर्गत न्याय मिळाला असता. आता वर्षभर त्यांना पुन्हा दुर्गम भागात राहावे लागणार आहे. शिक्षणाधिकारी यांनी अनास्था दाखविल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही नाईलाज झाल्याचे शिक्षक परिषदेने म्हटले आहे.