जि.प. कृषी सभापतींची पोल्ट्री व्यावसायिकांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:34+5:302021-01-23T04:32:34+5:30

सभापती अभिजित पाटील यांनी जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म मालक तसेच परिसरातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी यांच्याशी काही दिवसांपासून भेटी देऊन प्रत्यक्ष ...

Z.P. Discussion of Agriculture Speakers with Poultry Professionals | जि.प. कृषी सभापतींची पोल्ट्री व्यावसायिकांशी चर्चा

जि.प. कृषी सभापतींची पोल्ट्री व्यावसायिकांशी चर्चा

सभापती अभिजित पाटील यांनी जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म मालक तसेच परिसरातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी यांच्याशी काही दिवसांपासून भेटी देऊन प्रत्यक्ष चर्चा करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी नवापूर तालुक्यातील कुक्कुटपालन व अंडी उत्पादक व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बर्ड फ्लू आजाराबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व तंतोतंत पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. नंदुरबार जिल्ह्यात सद्यस्थितीत बर्ड फ्लू किंवा तत्सम कुठलाही आजार नसल्याने भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असा विश्वास जनतेला देत मांस व अंडी ७० अंश सेल्सिअसला उकळल्यास हा विषाणू नाहीसा होतो; परंतु मांसाहार शिजवून केला जात असल्याने आपल्या परिसरातील नागरिकांना विषाणूपासून कुठलाही धोका संभावित नाही, असे प्रतिपादन केले, तसेच याबाबत व्यावसायिकांना सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन पशुसंवर्धन विभाग करण्यास तत्पर आहे, अशी ग्वाही देऊन तशा सूचना संबंधिताना दिल्या. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी. पाटील, नवापूर पंचायत समितीचे पशूधन विकास अधिकारी डॉ.अशोक वळवी आदी उपस्थित होते.

Web Title: Z.P. Discussion of Agriculture Speakers with Poultry Professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.