अखेर जि़.प. आणि पं.स निवडणूकीचा बिगुल वाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:42 IST2019-12-18T11:42:00+5:302019-12-18T11:42:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा ...

अखेर जि़.प. आणि पं.स निवडणूकीचा बिगुल वाजला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि ११२ पंचायत समिती गण यांच्या निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली़
सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिसूचना लागू झाल्यावरही नंदुरबारसह राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत होती़ मंगळवारी न्यायालयाने या संदर्भात निकाल दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे़ यानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांसाठी १८ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे़ यासाठी तालुकास्तरावर कक्षांची निर्मिती करण्यात आली असून आॅनलाईन अर्ज दाखल करणाºया सदस्यांनी अर्जाची पोहोच पावती कक्षांमध्ये दाखल करण्याची माहिती उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
जिल्ह्यात पार पडणाºया या निवडणूक कार्यक्रमासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ अप्पर जिल्हाधिकारी डी़एम़ बोरुडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे़
४१८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात दाखल होणाºया नामनिर्देशन पत्रांची छाननी २४ डिसेंबर रोजी होणार आहे़ त्याच दिवशी वैध अर्जांची घोषणा करण्यात येणार असून यादी प्रसिद्ध होणार आहे़
४याप्रक्रियेनंतर ३० डिसेंबर रोजी जेथे अपील नाही तेथे व १ जानेवारी २०२० रोजी जेथे अपील आहे तेथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात येईल़
४याप्रक्रियेनंतर केवळ पाच दिवस प्रचार करुन ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १ हजार २२९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ यानंतर आठ जानेवारी रोजी सर्व सहा तालुकास्तरावर गण आणि गटनिहाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन निकालांची घोषणा करण्यात येईल़
४अक्कलकुवा तालुक्यात १०, धडगाव ७, तळोदा ५, शहादा १४, नंदुरबार १० तर नवापुर तालुक्यातील १० अशा ५६ गटांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असून एकूण १० लाख ४ हजार ८७३ मतदार मतदान करणार आहेत़
४जिल्ह्यात ७ जानेवारी २०२० रोजी होणाºया या मतदान प्रक्रियोसाठी ६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून बुधवारपासून कर्मचारी नियुक्ती आणि संवेदनशील मतदान केंद्र कोणते याची माहिती गोळा करण्यात येणार आहे़
४जिल्हा परिषद निवडणूक तसेच आरक्षण कार्यक्रमात कोणताही फेरबदल न करता प्रक्रिया पुढे ठेवण्यात येणार आहे़ अक्कलकुवा पंचायत समितीचे २०, धडगाव १४, तळोदा १०, शहादा २८ तर नंदुरबार आणि नवापुर पंचायत समितीच्या प्रत्येकी २० गणांसाठीचे आरक्षणही जैसे थे आहे़
४निवडणूकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या निरीक्षणात निवडणूक आचारसंहिता कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे़ याठिकाणी आचारसंहिता उल्लंघन तसेच इतर तक्रारी करता येणार आहेत़
४जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाण्याची शक्यता होती़ परंतू राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचात निवडणूकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशिन वापरण्याचे आदेश दिले असून दीड हजार ईव्हीएम दाखल होणार आहेत़