जि.प. सदस्य आपल्या भागात सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:54 IST2019-04-27T11:52:46+5:302019-04-27T11:54:01+5:30

मतांसाठी जोडणी : राष्टÑवादीचे अनेक सदस्य करताहेत भाजपचे काम

Zip Members activate in your area | जि.प. सदस्य आपल्या भागात सक्रीय

जि.प. सदस्य आपल्या भागात सक्रीय


मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य देखील आपल्या भागात आपल्या उमेदवारांसाठी सक्रीय झाले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेत निवडून आलेले बहुतेक जिल्हा परिषद सदस्य हे भाजपचे अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्यामुळे ते भाजपचे काम करीत आहेत. मतदार संघात एकुण सदस्यांच्या तुलनेत सर्वाधिक अर्थात ४७ सदस्य काँग्रेसचे आहेत.
नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात लोकसभा निवडणूक लागल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात. ती परिस्थिती पाच वर्षात कायम राहिली. त्यामुळे निवडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर येणे व काम दुसºया पक्षासाठी करणे असे बहुतेक ठिकाणी बहुतांश नंदुरबार जिल्ह्यातील चित्र होते.
नंदुरबार मतदार संघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर तालुक्याचा देखील समावेश आहे. या सर्व भागात एकुण ८५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य हे साक्री तालुक्यात आहेत. त्या खालोखाल शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या येते.
नंदुरबार जिल्ह्यात एकुण सदस्य संख्या ५५ इतकी आहे. त्यात २९ सदस्य हे काँग्रेस पक्षाचे तर २५ सदस्य राष्टÑवादीचे अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत गटाचे आहेत. केवळ एक सदस्य भाजपकडून निवडून आला होता. त्यांनी देखील राष्टÑवादीला अर्थात डॉ.गावीत गटाला साथ दिली होती. काँग्रेसचे सदस्य एकदिलाने आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी पक्षाने त्यांना जबाबदाºया देखील वाटून दिल्या आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचा घटक पक्ष असलेल्या राष्टÑवादीचे सदस्य अर्थात राष्टÑवादीच्या तिकीटावर निवडून आले तरी भाजपचे पर्यायाने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे समर्थक असलेले सदस्य भाजपचे काम करीत आहेत. त्यातील काही सदस्य नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे वरकरणी ते कामाला लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
साक्री व शिरपूर तालुक्यातील राष्टÑवादीचे सदस्य मात्र घटक पक्षाच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहेत.
शिवसेनेचा एक केवळ एक सदस्य मतदारसंघात आहे. ते देखील शिरपूर तालुक्यातील आहेत. व एक अपक्षा सदस्य असून त्यांची भुमिका स्पष्ट नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Zip Members activate in your area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.