जिल्हा परिषद शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांचा प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:31+5:302021-02-11T04:33:31+5:30

कोरोना महामारीपासू सर्वसामान्यांचे जीवन संकटात सापडले होते. मात्र गत महिनाभरापासून कोरोनाचा आलेक खाली आला आहेे. ग्रामीण भागात कोरोनाची भीती ...

Zilla Parishad school's talking walls waiting for students | जिल्हा परिषद शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांचा प्रतीक्षेत

जिल्हा परिषद शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांचा प्रतीक्षेत

कोरोना महामारीपासू सर्वसामान्यांचे जीवन संकटात सापडले होते. मात्र गत महिनाभरापासून कोरोनाचा आलेक खाली आला आहेे. ग्रामीण भागात कोरोनाची भीती दूर झाली आहे. त्यात लस उपलब्ध झाल्याने, वास्तव परिस्थितीचा आधार घेत बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरू होतील या आशेवर पालक वर्ग आहे, शहादा तालुक्यातील गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी वर्गाच्या प्रतीक्षेत आहे. शाळेतील शिक्षकांनी कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता थेट घरपोच सेवा दिली. विविध प्रकारच्या शिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद कायम ठेवला आहे.

डिजिटल ऑनलाइन शिक्षणसुद्धा सुरूच आहे. मात्र या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्टफोनची सुविधा नाही. काही पालकांकडे स्मार्टफोन असूनही कव्हरेज नसल्याने ऑनलाइन शिक्षण मिळत नाही. नेमक्याच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था मिळत असल्याने मनामध्ये भेदभावाचे विचार त्रासदायक ठरत आहे. तेव्हा सर्वांना समान न्याय मिळावा याकरिता शाळा सुरू होणे गरजेचे झाले आहे. शाळा नसल्याने विद्यार्थी वर्ग अभ्यासात रमत नाही. दिवसभर मित्रांसोबत खेळण्यात व्यस्त असतात. पालकसुद्धा आपल्या कामात व्यस्त असल्याने पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ अपुरा असतो.

---------

ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील परिषद केंद्र शाळेच्या संपूर्ण भिंती ग्रामपंचायतच्या मदतीने बोलक्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण सामान्य ज्ञान व शालेय वातावरणात अभ्यास घडावा, मैदानात असतानासुद्धा विद्यार्थ्यांचे लक्ष भिंतींनी आकर्षित करावेे यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची रेखाटने भिंतीवर अधोरेखित केली आहेत. शाळेचा परिसर हिरवागार असून, दररोज पाण्याची व्यवस्था शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे. अशा या प्रफुल्लित वातावरणात विद्यार्थी ज्ञानार्जनाकरिता उत्साही आहेत. शासन पुरस्कृत विद्यार्थ्यांकरिता स्वाध्याय उपक्रम सुरुवात आहे. शाळा सुीू व्हावी अशी अपेक्षा आहे. - संतराम राठोड, मुख्याध्यापक जि. प.केंद्र शाळा, ब्राह्मणपुरी ता.शहादा.

Web Title: Zilla Parishad school's talking walls waiting for students