जिल्हा परिषदेतील पदाधिका:यांच्या दालनांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:12 IST2019-07-21T12:11:58+5:302019-07-21T12:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रथमच प्रशासक नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेत शनिवारी पदाधिका:यांची वाहने जप्त करुन दालनांना टाळे लावण्यात ...

Zilla Parishad office: Do not open their doors | जिल्हा परिषदेतील पदाधिका:यांच्या दालनांना लागले टाळे

जिल्हा परिषदेतील पदाधिका:यांच्या दालनांना लागले टाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रथमच प्रशासक नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेत शनिवारी पदाधिका:यांची वाहने जप्त करुन दालनांना टाळे लावण्यात आल़े दरम्यान प्रशासक विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करुन कामकाज सुरु करण्यात आल़े  
प्रथम शनिवारी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्या दिमतीला असलेल्या कर्मचा:यांची त्यांच्या मूळ आस्थापनांमध्ये वर्णी लावण्यात आली़ यानंतर विविध दालनांची माहिती घेत कूलूप लावून वाहने जमा करण्यात आली़ शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांनी वाहने जमा करण्याचे आदेश काढले होत़े वाहने जमा झाल्यानंतर तसेच कक्षांना टाळे लागल्यानंतर प्रथमच कामकाजाच्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दालनांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत होता़ प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सोमवारी प्रथमच पंचायत समित्यांवर नियुक्त प्रशासक गटविकास अधिकारी आणि विविध विभागप्रमुखांची बैठक होणार आह़े या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या कामकाजावर चर्चा होणार आह़े 

प्रशासकीय समिती
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्य लेखापरीक्षक अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह विविध विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आह़े या समितीकडून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत केल्या गेलेल्या ठरावांवर चर्चा करण्यात येऊन विकास कामांना गती देण्यात येणार आह़े सोमवारी समितीची पहिली बैठक होणार आह़े 
 

Web Title: Zilla Parishad office: Do not open their doors