जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 11:06 IST2020-09-17T11:06:36+5:302020-09-17T11:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार ...

जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांनी यावेळी बोलतांना केले.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळा, अजेपूर ता. नंदुरबारचे विशाल दिलीप पाटील, जिल्हा परिषद शाळा, वडसत्रा ता.नवापूरचे हेमंत बाबुराव सुर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा म्हसावद (मुली) ता.शहादाचे रविंद्र सजन बैसाणे, जिल्हा परिषद शाळा दलेलपूर, ता.तळोदाचे नितीन बन्सीलाल महाजन, जिल्हा परिषद शाळा चिवलउतार ता. अक्कलकुवाचे जगदीश देवीदास पाटील, जिल्हा परिषद शाळा,चिंचकाठी ता.धडगांवचे अनिल फुरता पाडवी, जिल्हा परिषद शाळा बलवंड ता.नंदुरबारच्या सुशिलाबाई अंकुशराव पाटील, जिल्हा परिषद शाळा टेंभली ता.शहादयांच्याु रेखा सुरेश पाटील या शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अध्यक्ष अॅड.सीमा वळवी होत्या. उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती अॅड.राम रघुवंशी, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील, समाज कल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रमेश चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मानले. सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.
सिमा वळवी यांनी सांगितले, जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या तरी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबतची गोडी कमी होऊ देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षकांतर्फे हेमंत सूर्यवशंी यांनी मनोगत व्यक्त केले.