डेंग्यू निमरुलनासाठी जिल्हा परिषदही सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:33 AM2019-10-17T11:33:59+5:302019-10-17T11:34:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरी आणि ग्रामीण भागात फोफावलेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद सरसावली आह़े डेंग्यू ...

Zilla Parishad headed for Dengue Nimrulna | डेंग्यू निमरुलनासाठी जिल्हा परिषदही सरसावली

डेंग्यू निमरुलनासाठी जिल्हा परिषदही सरसावली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरी आणि ग्रामीण भागात फोफावलेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद सरसावली आह़े डेंग्यू निर्मुलनासाठी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात बैठक होणार होऊन उपाययोजनांचे नियोजन होणार आह़े 
डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरीही डेंग्यूचे रुग्ण समोर येणे थांबलेले नाही़ जिल्ह्यात आतार्पयत डेंग्यूचे 68 रुग्ण समोर आले आहेत़ त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसोबत जिल्हा परिषदेकडून वाढीव पथके आणि वाढीव उपाय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक विनय गौडा हे नवापुर, नंदुरबार, तळोदा आणि शहादा पालिकेच्या मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत नियोजन करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बैठकीत आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी उपस्थित राहून डेंग्यूसंदर्भात अहवाल सादर करणार आहेत़   
दरम्यान जिल्ह्यात बुधवारी 66 संशयित रुग्ण आढळून आल़े त्यांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली आह़े त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ 
 

Web Title: Zilla Parishad headed for Dengue Nimrulna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.