जिल्हा परिषद बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष राम रघुवंशींकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:11 IST2020-07-31T17:11:20+5:302020-07-31T17:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर ...

जिल्हा परिषद बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष राम रघुवंशींकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांच्या वाट्याला आली. अभिजीत पाटील यांच्याकडून या दोन्ही समित्या रघुवंशी यांच्याकडे आल्या. तर पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासूनच शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्थ व बांधकाम समितीची मागणी केली होती.परंतु राजकीय घडामोडी होऊन ही समिती काँग्रेसकडेच राहत ती अभिजीत पाटलांना देण्यात आली होती. तेंव्हापासून जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर आजच्या सभेत अॅड.रघुवंशी यांच्याकडे बांधकाम समिती आल्याने राजकीय नाराजी नाट्य काही प्रमाणात संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. सभा अध्यक्षा अॅड.सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते.