नंदुरबार जिल्ह्यात २६ ते ३० मे दरम्यान शून्य सावली दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:41+5:302021-05-23T04:29:41+5:30

हौशी भूगोल प्रेमींना ही पर्वणीच असणार आहे. शिवाय यातील प्रयोगांसाठी खर्चही येणार नाही. इयत्ता नववी ते १२ वी च्या ...

Zero shadow day between May 26 to 30 in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात २६ ते ३० मे दरम्यान शून्य सावली दिवस

नंदुरबार जिल्ह्यात २६ ते ३० मे दरम्यान शून्य सावली दिवस

हौशी भूगोल प्रेमींना ही पर्वणीच असणार आहे. शिवाय यातील प्रयोगांसाठी खर्चही येणार नाही. इयत्ता नववी ते १२ वी च्या अभ्यासक्रमात प्रकल्प कार्य आहे. यावर प्रकल्प करून तोच आपण वार्षिक परीक्षेत सादर करू शकतो.

नंदुरबार जिल्ह्यातील आशापुरी माता फाऊंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संचलित नक्षत्र छंद मंडळातर्फे २३ मे ते २७ मे या काळात निरीक्षण केले जाणार आहे. कोरोनाच्या काळात सर्व नियमांचे पालन करून आपण या घटनेचे साक्षीदार होऊ या. यासाठी नक्षत्र छंद मंडळ यु ट्युब तसेच इतर सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी मंडळाने वैज्ञानिक उपकरणांचीही निर्मिती केली आहे. त्यात सोलर डायल, पृथ्वीच्या कललेल्या आसाच मॉडेल, उत्तरायण - दक्षिणायनाचे मॉडेल अशा व या सारख्या अनेक मॉडेलद्वारे निरीक्षणे घेता येणार आहेत. - चेतना दिनेश पाटील, नक्षत्र छंद मंडळ, नंदुरबार

Web Title: Zero shadow day between May 26 to 30 in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.