युवारंग महोत्सवात मु.जे.विजेते तर प्रताप महाविद्यालय उपविजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:03 IST2020-01-20T17:03:16+5:302020-01-20T17:03:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग युवक महोत्सवात जळगाव येथील मु.जे.महाविद्यालय विजेते तर ...

युवारंग महोत्सवात मु.जे.विजेते तर प्रताप महाविद्यालय उपविजेते
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग युवक महोत्सवात जळगाव येथील मु.जे.महाविद्यालय विजेते तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरले. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात विविध कला प्रकारात पदक पटकावत डॉ.जी.डी. बेंडाळे स्मृती चषकावर जळगावातील मु.जे. महाविद्यालयाने आपले नाव कोरल़े तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या संघानेही आठ सुवर्णपदक पटकावत आपली मोहर उमटवत उपविजेता पदाचा कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक जिंकला़ ढोल-ताशे तसेच युवारंगाच्या गिताने बहरलेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या संघांनी आपापल्या महाविद्यालयांचे ङोंडे फडकवून आनंदोत्सव साजरा केला़.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहूलीकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रमोद पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, प्राचार्य आर.एस. पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, उपप्राचार्य डॉ.एन.के. पटेल, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, ईश्वर पाटील, सातपुडा साखर कारख्यान्याचे उध्दव पाटील, अधिसभा सदस्य मनिषा चौधरी, दिनेश नाईक, दिनेश खरात, डॉ.सत्यजित साळवे, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के. सोनी, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, प्राचार्य डॉ.डी.एम. पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पाटील, प्राचार्य जे.आर. पाटील मंचावर उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
नाव जाहीर होताचं
ढोल-ताशाचा गजर
मनोगते झाल्यानंतर पारितोषिकांचे डॉ.प्रा़ अविनाश निकम व प्रा.यशवंत शिरसाठ यांनी वाचन करून जाहीर केल़े त्यानंतर सुवर्णपदक, रौप्य, कांस्यपदक पटकाविणा:या संघांचे नाव जाहीर होताच त्या-त्या संघासोबतच्या सभामंडपात विद्याथ्र्याकडून ढोल-ताशांचा गजर तसेच जल्लोष करण्यात येत होता. विद्याथ्र्यानी महाविद्यालयांच्या नावांनी दिलेल्या घोषणाबाजीने महाविद्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
रंगमंचाजवळ विद्याथ्र्याचा जल्लोष
सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत असताना विद्याथ्र्यानी रंगमंचासमोर मोठी गर्दी केली होती़ पारितोषिक मिळाल्यानंतर विद्याथ्र्याकडून ढोल-ताश्यांचा गजर करीत आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता़. निकालाची उत्सुकता अन् जल्लोष
मोठय़ा उत्साहात पार पडलेल्या युवक महोत्सवाच्या विविध स्पर्धाचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी सकाळपासूनच निकालाची स्पर्धक कलावंतांमध्ये उत्सुकता लागून होती़ निकाल जसजसे जाहीर होत होते तसतसा विद्याथ्र्याकडून जल्लोष करण्यात येत होता. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या युवक महोत्सवात विद्यार्थी कलावंतांनी विविध कला सादर केल्या. बहुतेक स्पर्धक कलाकारांकडून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आल्यामुळे सोमवारच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागून होते. गटागटातून निकालांचे अंदाज लावण्यात येत होते.
स्पर्धक रवाना
स्पर्धाच्या निकालांची घोषणा झाल्यानंतर स्पर्धक विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले. या वर्षीच्या युवक महोत्सवात यश मिळाले नसले तरी येत्या महोत्सवात यशस्वी होण्याची अपेक्षा बाळगत स्पर्धकांनी निरोप घेतला. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी परतीला निघाल्यामुळे सायंकाळच्या सुमारास महाविद्यालय परिसरात शुकशुकाट दिसून आला़