पबजीचे वेड कमी करण्यासाठी युटय़ूब आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:49 IST2019-06-23T12:49:48+5:302019-06-23T12:49:53+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभर धुमाकूळ घालून पबजी नामक गेम ग्रामीण भारतीय युवकांच्या मोबाईलमध्ये अवतरला ...

Youtube base for reducing crazy craze | पबजीचे वेड कमी करण्यासाठी युटय़ूब आधार

पबजीचे वेड कमी करण्यासाठी युटय़ूब आधार

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगभर धुमाकूळ घालून पबजी नामक गेम ग्रामीण भारतीय युवकांच्या मोबाईलमध्ये अवतरला आह़े मेंदूवर ताबा मिळवणा:या गेमची नशा काहीशी कमी व्हावी म्हणून नंदुरबारातील चौघांनी मिळून यूटय़ूबसाठी व्हीडिओ तयार करुन वेगळा प्रयत्न करुन पाहिला आह़े   
नंदुरबार शहरातील जयेश पाठक, यश पवार, आसिफ खाटीक आणि कामिनी भोपे या चौघांनी मिळून दोन आठवडय़ापूर्वी पब्जीचे दुष्परीणाम दर्शवणा:या व्हिडिओ शूट करण्याचा विचार केला होता़ मग त्यावर चर्चा आणि संकल्पनेची बांधणी करत काम केल़े जयेश पाठक याने दिग्दर्शन, यश पवार याने डिजीटल कॅमे:याने व्हिडिओ, कामिनी भोपे हिने संवाद आणि इतर बाबी सांभाळल्या़ आसिफ खाटीक याने त्यात अभिनय केला़ नंदुरबार शहरातील नव्याने तयार झालेल्या एका चक्री मार्गाची निवड करत त्याठिकाणी अवघ्या अध्र्या तासा व्हिडिओ शूट करुन त्याचा एडीटिंग केलं़ याबाबत दिग्दर्शन करणा:या जयेश पाठक याला विचारला असता, त्याने सांगितले की, नंदुरबार शहरात असे बरेच मित्र आहेत, ज्यांना गेमिंगचं आभासी जग हे प्रचंड आवडतं़ तासनतास ते केवळ गेम खेळून काढतात़ यातून त्यांच्या मानसिक समस्या समोर आल्या आहेत़ एकलकोंडेपणा वाढून मित्रांसोबत त्यांची ताटातूट झाली आह़े हीच संकल्पना मांडून हा व्हिडिओ तयार केला़ 
नंदुरबार शहरासारख्या छोटय़ा शहरातील 14 ते 22 वर्षाच्या विद्याथ्र्यामध्ये असलेली गेमिंगची क्रेझ चिंताजनक आह़े यामुळे अभ्यासावर परिणाम होऊन दैनंदिन  व्यावहारिक जीवनापासून ते दुरावत आहेत़  यासाठी अशाप्रकारचे व्हिडिओ सहाय्यकारी ठरत आहेत़

Web Title: Youtube base for reducing crazy craze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.