लगAास नकारामुळे युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: April 10, 2017 23:38 IST2017-04-10T23:38:06+5:302017-04-10T23:38:06+5:30
युवकाविरुद्ध गुन्हा : मनवाणी येथील घटना

लगAास नकारामुळे युवतीची आत्महत्या
नंदुरबार : युवकाने शारीरिक अत्याचार करून लगAास नकार दिल्याच्या नैराश्येतून युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 5 एप्रिल रोजी मनवाणी, ता.धडगाव येथे घडली. युवकाविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनवाणी, ता.नंदुरबार येथील 22 वर्षीय युवतीस गावातीलच रायदा गारद्या वळवी याने प्रेमाचे आमिष दाखवून तिला ठिकठिकाणी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परत घरी आणून सोडून दिल्यावर तिच्याशी लगAास त्याने नकार दिला. त्यामुळे तरुणी नैराश्येत राहत होती. त्या नैराश्येतून तिने मनवाणीच्या वरचापाडा येथील काकांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत गिरणाबाई पोवल्या तडवी यांनी फिर्याद दिल्याने तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायदा गारद्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.