विवाहितेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:56 IST2018-08-05T04:56:21+5:302018-08-05T04:56:40+5:30

विवाहितेने २२ वर्षीय युवकाशी प्रेमसंबध निर्माण करून पळून जाण्यासाठी तगादा लावला.

Youth suicide due to marriage crisis | विवाहितेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

विवाहितेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

नंदुरबार : विवाहितेने २२ वर्षीय युवकाशी प्रेमसंबध निर्माण करून पळून जाण्यासाठी तगादा लावला. त्यास कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोदा येथे घडली. महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पतीसोबत सुखी नाही, त्यामुळे दोघे पळून जावून लग्न करू, असे तिने युवकाला सांगितले. अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तेव्हापासून युवक मानसिक दडपणाखाली होता, अशी फिर्याद तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे.

Web Title: Youth suicide due to marriage crisis