उभ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:46 IST2019-06-13T11:46:21+5:302019-06-13T11:46:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पंर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वार धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ...

उभ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पंर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वार धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहादा वळण रस्त्यावर मंगळवारी रात्री 11 वाजता घडली. याबाबत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल बाज्या पाडवी (19) रा.सुरवाणी, ता.धडगाव असे मयत युवकाचे नाव आहे. शहादा वळण रस्त्यावर रागदेवबाबा मंदीर रस्त्यालगत इंदूरकडे जाणा:या ट्रकचे (क्रमांक एम.पी.09-एचएच 2471) टायर पंर झाले होते. त्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा केला होता. अंधारात रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटर सुरू ठेवणे आवश्यक असतांना तसे काही न करता चालक व सहचालकाने ट्रक उभा केला. याचवेळी शहादाकडून लोणखेडाकडे दुचाकीवर जाणारा युवकाला अंधारात ट्रकचा अंदाज न आल्याने तो सरळ ट्रकवर जावून आदळला. त्यात त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक मडिया वेस्तासिंग मुझलटा रा.मध्यप्रदेश याच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार स्वप्नील गोसावी करीत आहे.
शहादा ते लोणखेडा वळण रस्त्यावर गेल्या दोन महिन्यात दुचाकी, चारचाकी वाहनांचे सहा अपघात झाले आहेत. त्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना जायबंदी व्हावे लागले आहे.