भरधाव वाहनाच्या धडकेत युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:27 IST2019-07-24T11:27:55+5:302019-07-24T11:27:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धवळीविहिर, ता.तळोदानजीक घडली.  करमसिंग दोहरा ...

Youth killed in heavy vehicle collision | भरधाव वाहनाच्या धडकेत युवक ठार 

भरधाव वाहनाच्या धडकेत युवक ठार 


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धवळीविहिर, ता.तळोदानजीक घडली. 
करमसिंग दोहरा वळवी (30) रा.माळखुर्द, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. त्यात करमसिंग वळवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय दिलवर वळवी, रा.बेडापाडा, ता.तळोदा व आणखी एकजण जखमी झाले. तळोदा पोलिसात मोटार अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
 

Web Title: Youth killed in heavy vehicle collision