डंपर व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:51 IST2018-12-16T12:51:23+5:302018-12-16T12:51:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : आमलीबारी नाक्याजवळ दुचाकीला डंपरने ठोस दिल्याने एका युवकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची ...

Youth killed in dump and bike accident | डंपर व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

डंपर व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : आमलीबारी नाक्याजवळ दुचाकीला डंपरने ठोस दिल्याने एका युवकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
अक्कलकुवा येथील अजरून राकेश सोनार (20) व  स्वप्निल विकास सोनार हे दुचाकीने (क्रमांक एम.एच. 39 एम- 8080) अक्कलकुवाकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला आमलीबारी नाक्याजवळ डंपरने (क्रमांक जी.जे. 5 वाय- 7717) धडक दिल्याने त्यात अजरुन राकेश सोनार हा ठार झाला                    तर स्वप्नील सोनार हा गंभीर              जखमी झाला. स्वप्निल यास गंभीर दुखापत झाली असून धुळे येथे खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ए.एस.आय. वसावे हे करीत आहेत. या घटनेबद्दल अक्कलकुव्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी-नेत्रंग या  राष्ट्रीय महामार्गावरील गव्हाळी-अककलकुवा ते तळोदा दरम्यानच्या रस्त्यावर  मोठमोठे जीवघेणे खड्डे असून रात्रीच्यावेळी समोरून येणा:या वाहनांचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने वाहने खड्डय़ात आदळून अपघात होत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Youth killed in dump and bike accident